President Election: मोदी-शाह यांच्यासह अनेकांनी केले मतदान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन आले, पाहा Photos By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:55 PM 2022-07-18T13:55:20+5:30 2022-07-18T14:05:15+5:30
President Election: आज राष्ट्रपतिपदासाठी मतदान होत आहे. देशभरातून एकूण 4,800 निवडून आलेले खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत. President Election: आज देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतिपदासाठी मतदान सुरू आहे. देशभरातून एकूण 4,800 निवडून आलेले खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत.
द्रौपदी मुर्मूंचा विजय जवळपास निश्चित आहे. मुर्मू यांना 27 हून अधिक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. एनडीएशिवाय अनेक विरोधी पक्षही यामध्ये सामील आहेत. यासोबतच देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर प्रथमच आदिवासी महिला विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात पोहोचून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही मतदानासाठी आले होते. मतदानादरम्यान समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसून आली. मनमोहन सिंग हे 89 वर्षांचे आहेत. त्यांनी व्हीलचेअरवर बसून संसद भवन गाठले आणि चार लोकांच्या मदतीने मतदान केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात राष्ट्रपतिपदासाठी मतदान केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी विधानसभेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत मतदान केले.
मथुरेच्या भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि राष्ट्रपतीपदाचे विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचे पुत्र भाजप खासदार जयंत सिन्हा यांनीही मतदान केले. जयंतने वडिलांऐवजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही मतदान केले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. या नेत्यांनी आपापल्या राज्यातील विधानसभेत मतदानाचा हक्क बजावला.
तिकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सबंधित राज्यातील विधानसभेत मतदान केले. जगनमोहन रेड्डी यांनी द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान करण्याचे जाहीर केले होते.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मूळच्या ओडिशाच्या आहेत. त्यामुळेच नवीन पटनायक यांनी विरोधात असतानाही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. पिनाराई आणि त्यांच्या आमदारांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान करण्याचे जाहीर केले होते. प्रमोद सावंत हे भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.