Prime Minister Narendra Modi inaugurated the activities of the second largest dam in the world
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाचे करणाार उद्घाटन By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 02:23 PM2017-09-16T14:23:47+5:302017-09-16T14:27:32+5:30Join usJoin usNext भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत. दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. हे धरण पाहायला पर्यटकही मोठया संख्येने येतात. या धरणामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल'. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi