प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांनी परिधान केली पगडी; जाणून घ्या काय आहे यात विशेष?
By जयदीप दाभोळकर | Updated: January 26, 2021 13:11 IST2021-01-26T13:06:06+5:302021-01-26T13:11:07+5:30

देश आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वप्रथम नॅशनल वॉर मेमोरिअल या ठिकाणी जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष पगडी परिधान केली होती. पाहूया काय आहे या पगडीची खास बाब.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही पगडी गुजरातमधील जामनगर येथील एका शाही कुटुंबानं भेट म्हणून दिली होती.
यासाठीच पंतप्रधान प्रजासत्ताक दिनी अशी पगडी बांधतात. यावेळीही पंतप्रधानांनी आपली परंपरा कायम ठेवली.
प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात मोदी हे पारंपारिक कुर्ता, पायजमा आणि जॅकेट परिधान करून उपस्थित होते. तसंच त्यांनी आपल्या खांद्यावर एक शॉलही घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पगडी परिधान करून येतात.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात त्यांनी 'बंधनी' परिधान केली होती.
२०१५ पासून आतापर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कपड्यांबाबत पंतप्रधानांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलंडमधील निर्वासित प्रेमानं जामनगरला 'लिटिल पोलंड' म्हणून संबोधतात. ज्याच्या नावावर नंतर एक चित्रपटही तयार झाला होता.
देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद... असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या होत्या.