PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:19 PM2024-11-28T22:19:12+5:302024-11-28T22:31:17+5:30

PM Modi Salary: भारतात पंतप्रधान पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे पद आहे. पंतप्रधानांना विशेष सुविधांसोबतच वेतन आणि भत्तेही मिळतात. पण, आपल्याला माहीत आहे का की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर महिन्याला केवळ ₹3,000 एवढाच सत्कार भत्ता मिळतो? तर जाणून घेऊयात पंतप्रधानांचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात...

पंतप्रधानांची सॅलरी - पंतप्रधानांची मासिक सॅलरी ₹1.66 लाख एवढी आहे. यात... बेसिक पे - ₹50,000, सत्कार भत्ता - ₹3,000, संसदीय भत्ता - ₹45,000 आणि दैनिक भत्ता - ₹2,000

सुरक्षा वैशिष्ट्ये पंतप्रधानांना चोवीस तास एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा पुरवली जाते. त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा वाहने आणि उपकरणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवासाची सुविधा - पंतप्रधानांना देशांतर्गत आणि परदेशात प्रवासासाठी सरकारी विमाने, हेलिकॉप्टर आणि विशेष वाहने वापरण्याचा अधिकार आहे. यासाठी खास एअर इंडियाचे वन विमान तयार करण्यात आले आहे.

वैद्यकीय सुविधा - पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात. यात कोणत्याही सरकारी आणि मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयाच्या खर्चाचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींचे अधिकृत निवासस्थान - 7 लोककल्याण मार्ग (पूर्वीचा रेसकोर्स रोड) येथे पंतप्रधानांचे आलिशान अधिकृत निवासस्थान आहे. हे निवासस्थान आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

पेन्शन सुविधा - पंतप्रधानांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळावर अवलंबून असते.

आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च - पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचा खर्च सरकार उचलते. यामध्ये प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था समाविष्ट आहे.

अधिकृत कर्मचारी आणि सुविधा - पंतप्रधानांना त्यांच्या जबाबदाऱ्यांसाठी एक समर्पित टीम दिली जाते. यात वैयक्तिक सहाय्यक, सल्लागार आणि तांत्रिक कर्मचारी आदींचा समावेश आहे.

निवृत्तीनंतरच्या सुविधा - पंतप्रधानपद सोडल्यानंतर त्यांना पाच वर्षांसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि एसपीजी संरक्षणाची सुविधा मिळते.

पंतप्रधानांचा साधेपणा - सर्व भत्ते आणि सुविधा असूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या साधेपणासाठी आणि कठोर परिश्रमासाठी परिचित आहेत. सरकारी जबाबदाऱ्यांसोबतच त्यांची साधी राहणीही लोकांसाठी प्रेरणादायी आहे.