नेताजींचे चित्र म्हणून अभिनेत्याच्या फोटोचे राष्ट्रपतींकडून अनावरण? राष्ट्रपती भवनातील प्रकार By देवेश फडके | Published: January 25, 2021 05:03 PM 2021-01-25T17:03:15+5:30 2021-01-25T17:10:01+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवनात नेताजींच्या एका फोटोचे अनावरण करण्यात आले. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनावरण केलेल्या फोटो वादात सापडला असून, तो फोटो नेताजींचा नसल्याचे सांगितले जात आहे. या चित्रातील व्यक्ती खरे नेताजी नसून, अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. वाचा... नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवनात नेताजींच्या एका फोटोचे अनावरण करण्यात आले. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनावरण केलेल्या फोटो वादात सापडला असून, तो फोटो नेताजींचा नसल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील व्यक्ती खरे नेताजी नसून, अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. या चित्राचे फोटो राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरूनही शेअर करण्यात आले आहेत.
अभिनेते प्रसेनजित चॅटर्जी यांनी 'गुमनामी' नावाच्या एका बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका साकारली होती. श्रीजित मुखर्जी यांनी दिग्दर्शन असलेल्या हा चित्रपट नेताजींच्या रहस्यमयी मृत्युसंदर्भात होता, असे सांगितले जाते.
अयोध्येतील राम मंदिराला ५ लाखांची देणगी दिल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नेताजी म्हणून अभिनेता प्रसेनजित यांच्या फोटोचे अनावरण केले आहे. देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करू शकत नाही), अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनीही ट्विटरवरून करत यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनीही यावर आक्षेप नोंदवत फोटो पाहून धक्का बसून, हा प्रकार लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे.
अनेक ट्विटर युझर्सनी हा फोटो अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी यांचा असल्याचा दावा केला आहे. तर, एका युझरने गुमनाम चित्रपटाच्या कलाकार निवडीला मानले पाहिजे, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रपती भवनात घडलेला प्रकार म्हणजे भगतसिंग यांचा फोटो म्हणून अजय देवगणचा फोटो लावण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
प्रसेनजित चॅटर्जी यांनी नेताजींची भूमिका चित्रपटात केली आहे. आपल्या देशात उपहासात्मक गोष्टी लिहिण्याची गरज नाही त्या घडतात, असा चिमटा एका युझरने काढला आहे.
एका युझरने थेट एका अभिनेत्याचा फोटो ट्विट करत, महात्मा गांधी यांच्या फोटोसाठी कोणता कलाकार योग्य ठरेल, अशी विचारणा केली आहे.
हा वाद चहाच्या पेल्यातील असल्याची प्रक्रिया असल्याचे काही युझर्सनी म्हटले आहे. तर, नेताजींचे हे चित्र खऱ्या फोटोवर आधारित असल्याचे म्हटले आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रपती भवनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.