चीनची चहूबाजूंनी कोंडी! भारताच्या युद्धसरावात पहिल्यांदाच अमेरिकेसह तीन मोठ्या शक्ती एकत्र येणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:02 PM 2020-07-11T14:02:44+5:30 2020-07-11T14:26:16+5:30
यंदाच्या मालाबार नौदलाच्या युद्धसरावासाठी ऑस्ट्रेलियाला लवकरच भारताकडून आमंत्रित केले जाऊ शकते. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात वारंवार घुसखोरी करणाऱ्या चीनला रोखण्यासाठी चार मोठ्या शक्ती पहिल्यांदाच मालाबारमध्ये एकत्र येणार आहेत. यंदाच्या मालाबार नौदलाच्या युद्धसरावासाठी ऑस्ट्रेलियाला लवकरच भारताकडून आमंत्रित केले जाऊ शकते.
यासह प्रथम अनौपचारिकरीत्या तयार केलेला क्वाड गट लष्करी टप्प्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. यात भारत आणि ऑस्ट्रेलियासह जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे.
आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाला यापासून दूर ठेवले होते, परंतु लडाखच्या सीमेवर चीनने केलेली कारवाई पाहता ऑस्ट्रेलियालाही या युद्धसरावाचं आमंत्रण देण्याची मोदींची योजना आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाला औपचारिक आमंत्रण देण्याच्या प्रस्तावावर पुढील आठवड्यापर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकेल.
मालाबार पूर्वी मर्यादित नौदल युद्धसराव असायचा, पण आता इंडो-पॅसिफिक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याअंतर्गत हिंदी महासागरातील चीनच्या हालचाली रोखण्याचा भारताचा मोठा उद्देश आहे. 2015मध्ये यात जपान सामील झाला होता.
चीनला जाणार मजबूत संदेश भारतानं २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाला सामील होण्यापासून थांबवलेले होते, जेणेकरून चीनला भारत क्वाडच्या माध्यमातून लष्करी विस्तार करत असल्याचं वाटू नये, पण लडाखमधील रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरील ताणतणाव आणि चीनच्या आक्रमक वृत्तीमुळे अखेर भारताने यावर ठोस भूमिका घेतली.
या अहवालात वॉशिंग्टनस्थित आरएएनडी कॉर्पोरेशनचे डेरेक ग्रॉसमॅन यांच्या हवाल्यानं सांगण्यात आले आहे की, यामुळे चीनला एक महत्त्वपूर्ण संदेश मिळेल की क्वाड प्रत्यक्षात संयुक्त नौदलाच्या माध्यमातून युद्धसराव करीत आहे."
भारताला आवश्यक असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक सैन्याचा पाठिंबा लडाखमधील हिंसाचाराच्या अगोदर भारताने आपला सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनबरोबर आपले संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशांशी संबंधही बळकट केले.
अहवालात पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त जी. पार्थासार्थी म्हणाले आहेत की, "चीनवर आमचे द्विपक्षीय आर्थिक निर्बंध आवश्यक आहेत, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण प्रादेशिक आणि जागतिक दलांच्या सहकार्याने कार्य केल्यास चीनवर परिणाम होऊ शकतो."
क्वाड मजबूत करणे महत्त्वाचे माजी परराष्ट्र सचिव आणि पॉलिसी रिसर्च सेंटरचे वरिष्ठ सहकारी श्याम सरन यांच्या मते, क्वाड मजबूत न केल्यास चीनला फायदा होईल.
त्यांनी असे म्हटले आहे की, जोपर्यंत चीन वेगवेगळ्या बाजूंच्या सूचनांचे अनुसरण करण्यास मनाई करेल, तोपर्यंत इंडो-पॅसिफिक रणनीती बीजिंगच्या सत्तेला उत्तर देण्यासाठी वापरावी लागेल.
भारताची ताकद वाढवण्यासाठी क्वाड त्याच्या केंद्रस्थानी असेल. भारताचे हित कुठे आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.