At the Rabindra Bharti Vidyapeeth, the enthusiasm of Holi is shigella
रवींद्र भारती विद्यापीठात होळीचा उत्साह शिगेला By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 06:05 PM2018-02-27T18:05:28+5:302018-02-27T18:05:28+5:30Join usJoin usNext कोलकात्यातील रवींद्र भारती विद्यापीठात होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक शाळा, कॉलेजमध्ये होळी सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होता. धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची प्रत्येक राज्यानुसार विभागणी झाली असून, जो तो आपापल्यापरीनं एकत्रितरीत्या होळी सण साजरा करतो. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असून, फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतूचा काळ असतो. वसंत उत्सवानिमित्तानं कॉलेजियन तरुणी विविधांगी रंगांमध्ये न्हाऊन निघाल्या होत्या.