राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 10:07 AM 2020-08-13T10:07:26+5:30 2020-08-13T10:19:29+5:30
India china tension : एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत. लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेल्या भागावरून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. याचवेळी भारतात राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. या विमानांनी सरावही सुरु केला आहे. भारताच्या 5 राफेल विमानांमुळे भयभीत झालेल्या चीनने तातडीने 36 विमाने एलएसीवर तैनात केली आहेत.
एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत.
चीनचे सैन्यदल ताकदवर असले तरीही त्यांच्याकडे पहाडी भागामध्ये हल्ले करण्याची आणि वेगाने हालचाली करण्याची ताकद नाहीय. राफेलच्या येण्यामुळे चीनचे सारे डावपेच फोल ठरले आहेत. होतान एअरबेसवर आधी 12 लढाऊ विमाने तैनात केली होती.
मात्र, 28 जुलैला अचानकच वेगवेगळ्या प्रकारची 36 लढाऊ विमाने आणण्यात आली आहेत. यामध्ये रशियामध्ये बनविलेली विमानेही आहेत. यामध्ये J-11 ही रशियन बनावटीची 24 बॉम्बवर्षक विमाने आहेत.
चीनने 6 जुनी J-8 फाइटर जेट्स, 2 Y-8G transports जेट्स, 2 KJ-500 एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि दोन MI-17 हेलिकॉप्टर आणली आहेत.
होतान हवाईतळावरून उड्डाण करण्य़ासाठी चीनची सर्व विमाने सक्षम नाहीत. कारण झिनजियांग प्रांतामध्ये मोठमोठे पर्वत आहेत. यामुळे चीनकडे त्यावर उडणारी विमाने नाहीत, हे चीनला देखील माहिती आहे.
भारतासोबत युद्ध झाल्यास चीनची ही विमाने केवळ होतान एअरबेसवरूनच उड्डाण करणार नाहीत. तर ती काश्गर आणि नगारी कुंशा एअरबेसवरूनही उड्डाण करणार आहेत. मात्र, लडाखपासून काश्गर 350 किमीआणि नगारी कुशा 190 किमी लांब आहेत.
चीनची लढाऊ विमाने जेव्हा एवढ्या लांबून येतील त्या वेळात भारताकडे मोठी तयारी होऊ शकते. भारत या विमानांचा हल्ला आरामात परतवून लावू शकणार आहे. कारण लडाखमधील एअर डिफेन्स सिस्टिम त्याच परिस्थितीसाठी तैनात करण्यात आली आहे.
चीनकडे असलेली लढाऊ विमाने भारताच्या राफेलसारखी हवेत 12-12 तास उडू शकत नाहीत. याचाच अर्थ ही ५ राफेलही चीनचे मनसुबे उद्ध्वस्त करू शकणार आहेत.
ल़डाखमध्ये त्या वातावरणात उडू शकणारी मिग 29 के आणि सुखोई सारखी लढाऊ विमाने आधीपासूनच तैनात आहेत.
लडाखमध्ये रोहिणी रडार तैनात करण्यात येणार आहे. हा रडार डीआरडीओने भारतीय सैन्य़ासाठी बनविला आहे. या शिवाय एकाचवेळी ६ शस्त्रे शोधणारा स्वाती रडार आधीपासूनच तैनात आहे.