railways to increase fair as airport levy
रेल्वे देणार दणका! प्रवास दरात होणार वाढ, मोदी सरकारकडून तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:51 PM2020-02-13T12:51:26+5:302020-02-13T13:01:57+5:30Join usJoin usNext जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या प्रवास दरात वाढ होणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांमध्ये एअरपोर्टच्या धर्तीवर लोकांच्या सुविधांसाठी हे वाढीव भाडे आकारण्यात येणार आहे. विमान प्रवासादरम्यान जनसुविधा विकास शुल्क (यूडीएफ) म्हणून प्रवाशांकडून जो टॅक्स घेतला जातो. त्याचप्रमाणे आता रेल्वेकडून हा शुल्क आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी सांगितले की, जनसुविधा विकास शुल्क एअरपोर्ट व्यवस्थापनाकडून जसा टॅक्स घेण्यात येतो, त्याचप्रमाणे हा शुल्क असणार आहे. या माध्यामतून स्थानकांच्या विकासासाठी निधीची व्यवस्था केली जाईल. यासाठी प्रवाशांकडून घेतले जाणारे शुल्क कमी असणार आहे, असे व्ही के यादव म्हणाले. या नवीन सुविधा शुल्कामुळे रेल्वेच्या प्रवास दरात वाढ होईल. मात्र, प्रवाशांना जागतिक स्तरावरील सुविधा स्टेशनांवर मिळाल्याचा अनुभव येईल, असेही व्ही के यादव म्हणाले. दरम्यान, नवीन विकसित रेल्वे स्टेशनवरील शुल्क याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार असणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच यासंबंधी परिपत्रक काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात 400 रेल्वे स्थानके पुनर्विकसित करण्याची घोषणा केली होती. टॅग्स :रेल्वेनरेंद्र मोदीrailwayNarendra Modi