rajasthan chambal river new bride jumps in the river
उलटीचं कारण देत गाडीतून उतरली नववधू अन् केलं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 08:07 PM2020-06-14T20:07:37+5:302020-06-14T20:20:39+5:30Join usJoin usNext लग्न झाल्यानंतर सासरी निघालेल्या वधूनं चंबळ नदीच्या पुलावर गाडी थांबवली आणि... राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे लग्नाचा आनंद शोकसागरात बुडाला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी निघालेल्या वधूनं चंबळ नदीच्या पुलावर गाडी थांबवली आणि नदीत उडी मारली. या घटनेनं वराकडच्या मंडळींनी आरडाओरडा केला. कोणालाही काहीही समजण्याच्या आतच तिनं पुलावरून नदीत उडी घेतली. त्याचदरम्यान गाडी चंबळ नदीच्या पुलावर आली, नववधून गाडीतून खाली उतरली आणि लोकांना काही समजण्याच्या आतच तिने पुलाच्या रेलिंगमधून नदीत उडी मारली. हे पाहून वराला व त्याच्या साथीदारांना धक्काच बसला. आरडाओरडा ऐकल्यानंतर स्थानिक लोक तेथे जमले होते. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून, स्थानिकांच्या मदतीनं वधूचा शोध घेतला जात आहे. बोटीतून काही स्थानिकही वधूचा नदीच शोध घेत आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे एक दिवस आधी लग्न झाले होते आणि लग्नाच्या काळात ती खूप आनंदी होती. लग्नात नववधू आपल्या पतीबरोबर आनंदच्या भरात नाचलीसुद्धा होती. ज्या पुलावरून महिलेने उडी मारली तो पूल राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चंबळ नदीवर बांधलेला पूल आहे. त्यामुळे त्याला चंबळ पूल असेही म्हणतात. या घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या खंडार पोलीस ठाण्याचे आणि मध्य प्रदेशच्या समरसा चौकी पोलिसांचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी आनंदात असणाऱ्या मुलीनं असं का केलं असावं असा प्रश्नही आता पोलिसांना सतावतो आहे. मुलीकडची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. लॉकडाऊनच्या काळातही अगदी साधेपणानं हे लग्न करण्यात आलं होतं. लग्नात नववधू वराबरोबर आनंदातही असल्याचंही तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण मग त्या नववधूनं अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचाच पोलीस आता तपास करत आहेत.