चित्रपटाचा पडदा गाजवणारा हा नायक राजकारणातही सुपरस्टार होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 17:31 IST2017-12-28T17:17:36+5:302017-12-28T17:31:51+5:30

कोडम्बक्कम येथे एका लग्नसोहळ्याला गेलेल्या रजनीकांत यांच्या पाया पडण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी रजनी यांनी चाहत्यांना माझ्या नको आई-वडिलांच्या पाया पडा असा सल्ला दिला.
राजकारणात सक्रिय होण्याच्या दिशेन रजनीकांत यांची पावले पडत आहेत, येत्या 31 डिसेंबरला त्यावर शिक्कामोर्तब होईल.
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे.
दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी चाहत्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते.