"...तो पंतप्रधानही होऊ शकतो"; Zomato डिलिव्हरी बॉयला आता राखी सावंतचा सपोर्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:59 PM2021-03-23T16:59:31+5:302021-03-23T17:25:04+5:30

Rakhi Sawant And Zomato Delivery Boy : अभिनेत्री राखी सावंत हिने देखील झोमॅटोच्या कामराजची बाजू घेत या वादामध्ये उडी घेतली आहे

Zomato वरून मागवलेलं जेवण उशिरा आल्याने एका तरूणीनं (hitesha chandranee) ते रद्द केले म्हणून चिडून डिलिव्हरी बॉयने (Zomato Delivery boy hit on nose) आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा दावा महिलेने काही दिवसांपूर्वी केला होता.

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉय कामराज याला ग्राहक हितेशा चंद्रानी यांच्यात झालेल्या मारहाण प्रकारणाची सध्या चर्चा रंगली आहे. अनेकांनी सेलिब्रिटींनी कामराज याला समर्थन देत त्याची बाजू घेतली आहे.

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने देखील झोमॅटोच्या कामराजची बाजू घेत या वादामध्ये उडी घेतली आहे. राखीला या प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने आता उत्तर दिलं आहे.

"कामराजवर अन्याय झाल्याने मी खूपच दुःखी झाले आहे. आपल्या भुकेच्यावेळी हे डिलिव्हरी बॉय आपल्यासाठी जेवण घेऊन येतात. कोरोनाच्या या काळात ते घराबाहेर पडून आपल्याला खायला आणून देण्याची जोखीम पत्करत असल्याने त्यांचा आपण सन्मान ठेवायला हवा."

"माणुसकीने वागत त्यांना पाणी विचारायला हवे. जर माझ्या घरी कुणी डिलिव्हरी बॉय आला तर त्याला आवर्जून पाणी विचारते. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा, आदर करा. कारण कुणाला हे माहिती नसते की उद्या कोणती व्यक्ती पंतप्रधान होईल. त्यामुळे प्रत्येकाचा आदर करा"

"आपण कुणाला काही देऊ शकत नाही तर किमान प्रेमाचे दोन शब्द त्याच्याशी बोलू शकतो. त्यासाठी पैसे लागत नाही" असं म्हणत राखीने झोमॅटो बॉयची बाजू घेतली आहे. याआधी काही सेलिब्रिटींनी कामराजच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अटक केलेल्या झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजनं पोलिसांना चौकशीमध्ये आपली बाजू सांगितल्याचंही समोर आलं होतं. यामध्ये आता पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता संबंधित तरूणीवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

डिलिव्हरी बॉयसोबत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. तरूणीनं झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारलं, त्याला शिवीगाळही केला आणि नंतर त्याचाच विरोधात खोटी तक्रार दाखल केली असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

कामराज या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर तरूणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात सध्या ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी म्हणणं मांडलं आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हिचा वैद्यकीय खर्च उचलला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आलं आहे, असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होचं. एवढंच नव्हे, तर कामराज याचा न्यायालयीन खर्चही उचलला जात आहे, असं गोयल यांनी नमूद केलं होतं.

कामराजनं गेल्या 26 महिन्यांत 5 हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल डिलिव्हरी केली आहे. झोमॅटो कंपनीत कामराजला 4.57 असे उत्कृष्ट रेंटिंग ग्राहकांकडून देण्यात आलं आहे .या प्रकरणात नेमकं काय घडलं, सत्य काय आहे, याचा शोध झोमॅटो घेणार आहे, असंही दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होतं.