श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं घरोघरी दिलं जातंय निमंत्रण, अयोध्येतून आलेल्या पवित्र अक्षतांचं काय करायचं? By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:35 PM 2024-01-15T18:35:42+5:30 2024-01-15T18:45:39+5:30
Ram Mandir: अयोध्येत उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. मात्र अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं करायचं काय? याबाबत सर्वसामान्य लोक संभ्रमाचं वातावरण आहेत. अयोध्येत उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. मात्र अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं करायचं काय? याबाबत सर्वसामान्य लोक संभ्रमाचं वातावरण आहेत.
भारतामध्ये प्राचीन काळापासून अक्षता देऊन निमंत्रण देण्याची परंपरा आहे. निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळांचा वापर केला जातो. हिंदू धर्मामध्ये अक्षतांना विशेष महत्त्व आहे. तसेच कुठलीही पूजा, अनुष्ठान, धार्मिक कार्य या अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. आता अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं काय करायचं, याबाबत जाणकारांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे.
तिजोरीमध्ये ठेवाव्यात तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे शुक्र ग्रहापासून धनवैभव लक्ष्मी समस्त भौतिक सुखं सुविधा प्राप्त होतात. त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजेत. असं केल्याने मंगलं आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात.
प्रसाद बनवा ज्योतिषाचार्यांच्या मते, राम मंदिरातून आलेल्या तांदळांचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी या तांदळांची खीर बनवता येईल. त्यानंतर ही खीर कुटुंबासह प्रसाद म्हणून ग्रहण करता येईल.
मस्तकावर टिळा म्हणून लावता येतील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या तांदळांचं विशेष महत्त्व आहे. ते शुभाची निशाणी आहे. त्यामुळे शुभकार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षता टिळा म्हणून डोक्यावर लावता येऊ शकतात. असं केल्याने ठरवलेलं काम सहजपणे पूर्ण होईल.
भोजनात वापरता येतील ज्या कुटुंबामध्ये नव्याने विवाह सोहळा झाला असेल, त्या कुटुंबातील वधू घरात पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळांचा वापर करू शकते. असं केल्याने घरात सुखसमृद्धी येईल.