Ramanujacharya Statue: २१६ फूट उंची, १ हजार कोटी रुपये खर्च, अशी आहेत स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची खास वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:37 PM 2022-02-05T13:37:34+5:30 2022-02-05T13:43:42+5:30
Ramanujacharya Statue: संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैदराबादमध्ये स्टॅचू ऑफ इक्वालिटी प्रतिमेचे अनावरण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैदराबादमध्ये स्टॅचू ऑफ इक्वालिटी प्रतिमेचे अनावरण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
ही प्रतिमा पंचधातूपासून तयार करण्यात आली आहे. यामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे. बैठ्या मुद्रेतील ही जगातील सर्वात उंच प्रतिमांपैकी एक आहे.
जीयार एज्युकेशनल ट्रस्टचे अधिकारी सूर्यनाराणय येलप्रगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी बसलेल्या अवस्थेतील जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे.
श्री चिन्ना जीयार स्वामी आश्रमातील ४० एकरच्या विस्तृत परिसरामध्ये २१६ फुटांची स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे.
स्टॅच्यू ऑप इक्वालिटी संत रामानुजाचार्य यांच्या जन्माला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ तयार करण्यात आले आहे. या योजनेतील एकूण खर्च १ हजार कोटी रुपये आहे.
या पुतळ्यातील दुसऱ्या मजल्यावर सुमारे तीन लाख चौफूट क्षेत्रामध्ये रामानुजाचार्य यांचे मंदिर आहे. येथे पूजेसाठी रामानुजाचार्यांच्या १२० किलो सोन्याच्या मूर्तीची स्थापना होणार आहे.
स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे उद्घाटन रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंती समारोह अर्थात १२ दिवसीय श्री रामानुज सहस्त्रब्धी समारोहाचा एक भाग आहे.
आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, याला जागतिक रूप देण्यासाठी मूर्तीजवळ सर्व देशांचे झेंडे लावण्यात येणार आहेत. त्यांच्या मते हा धर्म, जात आणि पंथांसह जीवनातील सर्व पैलूंमध्ये संत रामानुजाचार्य यांच्याकडून प्रचारित करण्यात आलेल्या समानतेच्या विचारानुसार प्रस्तावित आहे.
१४ हजार ७०० चौरस फूटांच्या वरच्या मजल्यावर एक वैदिक डिजिटल वाचनालय आणि रिसर्च सेंटरसुद्धा आहे.
विमानतळ आणि श्रीरामनगरमच्या जवळच्या भागात एकूण आठ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पीएमओने दिलेल्या माहितीनुसार हा पुतळा ५४ फूट उंच आधार भवनावर स्थापन करण्यात आला आहे. त्याचे नाव भद्र वेदी आहे. यामध्ये वैदिक डिजिटल वाचनालय, संशोधन केंद्र प्राचीन भारतीय ग्रंथ, एक थिएटर, आणि एक गॅलरी आहे. जी संत रामानुजाचार्य यांच्या कार्यांचे विवरण यांची प्रस्तुती करण्यात आली आहे.