Rashtrapati Bhavnavati Mughal Garden will soon open soon
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन लवकरच होणार खुले By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:56 PM2019-01-31T14:56:20+5:302019-01-31T15:10:46+5:30Join usJoin usNext राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. एकट्या गुलाबाच्याच तिथे 150 हून अधिक प्रजाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत. दिल्ली शहराची उभारणी करणारा सर एडवर्ड ल्युटन्स याने या मुघल गार्डनची उभारणी केली होती. ब्रिटिश काळातील भारतातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्जच्या पत्नीसाठी ते उभारण्यात आले. मुघल गार्डन 6 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. मात्र दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि 2 मार्च रोजी होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे.