Ratan Tata: हर घर तिरंगा... देश का नमक म्हणणाऱ्या रतत टाटांनीही फडकवला झेंडा By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 08:08 AM 2022-08-13T08:08:00+5:30 2022-08-13T09:46:04+5:30
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यातच देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घडामोडींची ते आवर्जुन दखल घेत असतात आणि त्यावर आपली भूमिका देखील स्पष्ट करत असतात.
आनंद महिंद्राच्या ट्विट किंवा फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा होत असते. आज पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी एक खास पोस्ट केली आहे. आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत अगोदर एक फोटो ट्विट केला.
महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोत ते राष्ट्रध्वज पकडून उभे आहेत आणि त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसून येत आहे. आता, त्याच महिला अधिकारी रतन टाटा यांच्यासमेवतही तिरंगा फडकवताना दिसून येतात. या महिला पोस्ट खात्याच्या अधिकारी आहेत.
देशाच्या पोस्ट खात्याने भारताला जोडण्याचं काम केलं. एकेकाळी संदेशवहनाचा सर्वात प्रभावी आणि एकमेव माध्यम म्हणजे पोस्ट ऑफिस होतं. पत्रापासून ते आंतरदेशीय आणि तार पाठविण्याच्या अनेक आठवणी पोस्ट ऑफिसशी निगडीत आहेत.
पोस्ट खाते आजही दिमाखात कार्यरत आहेत, पार्सल सेवांसह अनेक डिजिटल इंडियाच्या सेवा देण्याचं काम पोस्ट खात्यामार्फत होतं. म्हणूनच, पोस्ट खात्याचा हर घर तिरंग मोहिमेत लक्षणीय सहभाग आहे. त्यातूनच, या अधिकाऱ्यांनी देशाभिमान असलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन तिंरगा फडकवला आहे.
मुंबईच्या पोस्टमास्तर जनरल यांच्याकडून उद्योगपती रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना गिफ्ट म्हणून राष्ट्रध्वज प्राप्त झाला आहे. मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रध्वज दिला.
याबाबत पोस्ट विभागाचे आभार व्यक्त करताना आनंद महिंद्रा यांनी स्वाती पांडे यांच्यासोबत फोटो ट्विट केला. यात आनंद महिंद्रा यांनी देशातील पोस्ट विभागाचं कौतुक करताना टपाल व्यवस्था देशाची 'धडकन' असल्याचं म्हटलं आहे.
तसेच, केंद्रीयमंत्री अश्विन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन रतन टाटा, आनंद महिंद्रा यांच्यासह ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंच्या हाती तिरंगा फडकवल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत, देशाचा अभिमान... असे कॅप्शनही त्यांनी दिलंय. ते ट्विट महिंद्रा यांनी रिट्वीट करत धन्यवाद असे म्हटले आहे.