ज्येष्ठ सिने-अभिनेत्री व संसद सदस्य रेखा यांनी राजभवनातील पाय-यांवर केलं फोटोसेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:22 IST2017-09-25T21:18:42+5:302017-09-25T21:22:04+5:30

ज्येष्ठ सिने-अभिनेत्री आणि संसद सदस्य रेखा यांनी २५ सप्टेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात जाऊन भेट घेतली.
अभिनेत्री रेखा व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी सी. विनोदाही उपस्थित होत्या.
अभिनय सम्राज्ञी रेखा, सोमवारी राजभवनात आली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि त्यांच्या पत्नी सी. विनोदा यांची राज्यसभा सदस्य या नात्याने त्यांनी सदिच्छा भेट घेऊन फोटोही काढले.
राजभवनात चक्कर मारताना दरबार हॉलच्या समोरील बॅक्वेंट हॉलच्या पाय-या दिसताच त्यांनी तेथे बसून फोटोग्राफरना पोजही दिली.
अगदी सहज आणि रेखाच्या त्याच पोजमधील फोटो राजभवनाने प्रसिद्धीस दिले होते.