प्रजासत्ताक दिनाची राजधानी दिल्लीत रंगीत तालीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 11:44 IST2018-01-24T11:31:37+5:302018-01-25T11:44:15+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (23 जानेवारी) राजधानी दिल्लीत रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनी सकाळी 9.50 वाजता विजय चौकातून परेड सुरू होणार आहे आणि राजपथ, इंडियागेट, टिळकमार्ग, बहादूर शहा जफरमार्ग आणि नेताजी सुभाषमार्गवरुन ही परेड लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणार आहे.
प्रजासत्ताक दिनी केंद्रीय सचिवालय व उद्योग भवन मेट्रो स्टेशनवर मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून प्रवेश बंद असणार आहे.
पटेल चौक व रेस कोर्स मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर पडण्यासाठी सकाळी 8.45 ते रात्री 12.30 वाजेपर्यंत बंदी असणार आहे.
दरम्यान, मंगळवारच्या तालमीमुळे काही मार्ग बंद करण्यात आले होते.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे.