Republic Day Event: प्रजासत्ताक दिनाच्या परेडला यंदा 'नो गेस्ट'; चौथ्यांदा पुन्हा तेच घडणार! By मुकेश चव्हाण | Published: January 6, 2021 11:19 AM2021-01-06T11:19:04+5:302021-01-06T11:23:06+5:30Join usJoin usNext ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. "कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रकोपामुळे मंगळवारपासून देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. अशावेळी मी ब्रिटनमध्येच राहणं जास्त संयुक्तीक आहे. ब्रिटनला माझी गरज असून कोरोनाविरोधात लढा देणं महत्वाचं आहे", असं बोरिस जॉन्सन मोदींना फोनवर म्हणाले. तसेच कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर नक्की भारताचा दौरा करेल, असं बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. आगामी भारताच्या प्रजासत्ताक दिनी कोणीही प्रमुख पाहुणे उपस्थित नसणार आहे. हा प्रसंग चौथ्यांदा घडतो आहे. याआधी 1952, 1953 आणि 1966 मध्येही प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. त्यामुळे 2021 मध्येही प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार नसल्याचे असं आता चौथ्यांदा घडणार आहे. तसेच अनेकवेळा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोन- दोन प्रमुख पाहुणेही उपस्थित होते. 1956, 1968 आणि 1974 साली इतर देशातील दोन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सन 2018 मध्ये 10 आशियायी देशातील प्रमुख प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात इतक्या देशांच्या प्रमुखांनी भाग घेण्याची ही पहिली वेळ होती. दरम्यान, इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे इंग्लंडमधील एक तृतीयांश म्हणजे जवळपास 44 बिलीयन नागरिक अनंत अडचणींचा सामना करत आहेत. इंग्लंडमधील विविध रुग्णालयात सोमवारी जवळपास 27 हजार कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांपेक्षा 40 टक्के अधिक आहे. गेल्या मंगळवारी अवघ्या 24 तासांत 80 हजाराहून अधिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. टॅग्स :प्रजासत्ताक दिनभारतइंग्लंडकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीRepublic DayIndiaEnglandcorona virusNarendra Modi