Republic Day, Horse Virat: पंतप्रधान मोदी राजपथावर 'त्या' घोड्याला पाहून नेमके का खूश झाले? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 03:36 PM 2022-01-26T15:36:35+5:30 2022-01-26T15:42:25+5:30
Republic Day, Horse Virat: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राजपथावली संचलनानंतर एका घोड्याची आवर्जुन भेट घेतली. यामागचं कारण आहे होतं हे आपण जाणून घेऊयात... राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राष्ट्रपतींच्या सुरक्षा एस्कॉर्टमध्ये समावेश असलेल्या 'विराट' नावाच्या घोड्याची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. गेल्या १० वर्षांपासून सेवेत असलेला 'विराट' आज निवृत्त झाला आहे.
राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड कर्नल अनुप तिवारी आज प्रजासत्ताक दिनाच्या संचनलात 'विराट'चं स्वारथ्य करत होते.
सेवेतून निवृत्त होत असलेल्या विराटची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जुन भेट घेतली. 'विराट'च्या मानेला कुरवाळत त्यांनी घोड्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस देखील केली.
विराटनं आपल्या कार्यकाळात अनेक राष्ट्रपतींना सलामी दिली आहे. मोदींनी यावेळी विराटसोबत उपस्थित असलेल्या जवानांकडून त्याची माहिती जाणून घेतली.
विराटला विशिष्ट योग्यता आणि सेवेसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन कार्डनं सन्मानित देखील करण्यात आलं आहे. सेवाकाळात विशेष कार्य आणि प्रशासनासाठी विराटला हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.
विराटचं ट्रेनिंग रिमाऊंट ट्रेनिंग स्कूल हेमपुर येथून झालं आहे. २००३ साली हा घोडा राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकात सामील झाला. होनोवेरियन जातीचा हा घोडा असून भारतीय लष्कराकडून देखील त्याचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
विराटनं आपल्या सेवा काळात एकून तीन राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकात सेवा दिली आहे. यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा समावेश आहे.
प्रेसिडेंट बॉडीगार्डनं आज प्रजासत्ताक दिनी विराटच्या निवृत्तीची घोषणा केली. विराटनं आपल्या सेवा काळात आतापर्यंत एकूण १३ वेळा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.