प्रजासत्ताक दिन विशेष : भारताबाबतच्या या गोष्टी तु्म्हाला माहित नसतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 23:49 IST2018-01-25T23:14:45+5:302018-01-25T23:49:20+5:30

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारताचा उल्लेख सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा, असा केला होता.
दुध उत्पादनामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा सोहळा आहेत. या कुंभमेळ्याचे उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र.
भारतातील टपाल खाते हे जगातील सर्वात मोठे टपाल खाते आहे. तसेच तलावामधील वैशिष्ट्यपूर्ण पोस्ट ऑफिसही भारतात आहे. 2011 साली जम्मू-काश्मीरमधील दल सरोवरात या पोस्ट ऑफिसचे उद्धाटन करण्यात आले होते.
मेघालयमधील मौसिनराम हे भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण आहे.
18 व्या शतकापर्यंत हिरे सापडणारा भारत हा जगातील एकमेव देश होता. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील कृष्णा आणि गुंटुर परिसरात हिरे सापडत.
जगातील सर्वाधिक उंचीवरचे क्रिकेटचे मैदान भारतात आहे. हिमाचल प्रदेशमधील चाली येथे हे मैदान आहे.
साखर बनवण्याचे कौशल्य सर्वप्रथम भारतीयांनी आत्मसात केले होते.
भारत हा जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या असलेला देश आहे.
भारतात तयार करण्यात आलेले पहिले रॉकेट चाचणीसाठी सायकलवरून नेण्यात आले होते.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या मानधनापैकी केवळ निम्मेच मानधन घेत असत.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांनी 2006 साली स्वित्झर्लंडचा दौरा केल्यावर स्वित्झर्लंडने तो दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती.
रवींद्रनाथ टागोर यांनी भारताप्रमाणेच बांगलादेशचे राष्ट्रगीतही लिहिले आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यान चंद यांना बर्लिन ऑलिम्पिकनंतर जर्मनीचे नागरिकत्व घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
कबड्डीचे सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे.