जगन्नाथ मंदिराकडे अंबानींपेक्षाही अधिक संपत्ती! ही आहेत देशातील प्रसिद्ध मंदिरं, जेथे भक्त देतात कोट्यवधींची देणगी By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 01:43 PM 2024-07-17T13:43:10+5:30 2024-07-17T14:12:28+5:30
Richest Temple: ...मात्र, जगन्नाथ मंदिराप्रमाणेच भारतात इतरही अनेक मंदिरे आहेत, जेथे भक्त दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची देणगी देतात. जाणून घेऊया... जगन्नाथ पुरी मंदिराचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर, आता 46 वर्षांनतंर मंदिराचा खजीनाही खुला करण्या आला आहे. महत्वाचे म्हणजे, 46 वर्षांपूर्वी पुरीच्या खजिन्यात 128 किलो सोने आणि 221.53 किलो चांदी मिळाली होती. मात्र, लाखो करोडो रुपयांचा खजिना मिळालेले ओडिशाती जगन्नाथ मंदिर हे एकमेव मदिर आहे असे नाही, तर याशिवायही भारतात अशी अनेक मंदिरं आहेत. जाणून घेऊयात त्यासंदर्भात...
जगन्नाथ मंदिर - ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा खजिना तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आला आहे. येथे मिळालेल्या संपत्तीची मोजणी अद्याप सुरू आहे. मात्र, जगन्नाथ मंदिराप्रमाणेच भारतात इतरही अनेक मंदिरे आहेत, जेथे भक्त दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची देणगी देतात.
महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईंबाबा मंदिर - महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर देशभरात प्रसिद्ध आहेत. येथे रोज किमान 25000 भावीक दर्शनासाठी येतात. 1922 साली बनलेल्या या मंदिरात 2022 पर्यंत 400 कोटींहून अधिकचे दान झाले होते. महत्वाचे म्हणजे, मंदिराच्या वतीने रुग्णांना मदत आणि रोज हजारों लोकांना मोफत भोजन भोजन दिले जाते.
जम्मूतील वैष्णो देवी मंदिर - समुद्रसपाटीपासून तब्बल 5200 फूट उंचावर असलेले जम्मूतील कटरा येथील माँ दुर्गेचे वैष्णो देवी मंदिर. हे मंदिरही अत्यंत लोकप्रिय असून भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे 2000 ते 2020 पर्यंत 1800 किलो सोने, 4700 किलो चांदी आणि 2000 कोटी रुपये रोख एवढी संपत्ती भाविकानी अर्पण केली आहे.
तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर - पद्मनाभस्वामी मंदिराच जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये समावेश होतो. या मंदिराकडे जवळपास 1,20,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. महत्वाचे म्हणजे, मंदिराच्या खजिन्यात सोने, पन्ना, प्राचीन चांदी आणि हिरे आदींचा समावेश आहे. 2015 साली येथे मिळालेल्या मोठ्या खजिन्यामुळे मंदिराच्या संपत्तीत आणखी वाढ झाली.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर - तिरुमलाच्या टेकड्यांवर असलेले तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वराचे मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची संपत्ती अंदाजे 3 लाख कोटी रुपये एवढी आहे. येथे रोज सुमारे 50,000 भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराचे वार्षिक उत्पन्न 1400 कोटी रुपये एवढे आहे.
केरळमधील गुरुवायूर देवस्वोम - केरळ मधील गुरुवायूर देवस्वोम हे भगवान विष्णू यांचे एक प्राचीन मंदिर त्यंत प्रसिद्ध आहे. या मंदिराची 1737.04 कोटी रुपये एवढी रक्कम बँकेत जमा आहे. 271.05 एकर जमिनीसह अनेक मालमत्ता मंदिराकडे आहेत. यात सोने, चांदी आदींचा समावेस आहे.
(टीप - ही माहिती सामान्य मान्यता आणि माध्यमांतील माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकमत डॉट कॉम याची पुष्टी करत नाही.)