Robots serve customers at 1st 'smart' restaurant in Odisha
लई भारी! 'या' रेस्टॉरंटमध्ये आहेत मेड इन इंडिया 'रोबो वेटर्स' By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:51 PM2019-10-18T12:51:55+5:302019-10-18T13:04:02+5:30Join usJoin usNext भुवनेश्वर शहरात बुधवारी ‘रोबो शेफ’ या नावाच्या उपाहारगृहात (रेस्टॉरंट) मेड इन इंडिया रोबोट ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. ‘चंपा’ आणि ‘चमेली’ अशी या दोन रोबो वेटर्सची नावं आहेत. पूर्व भारतात अशी सेवा देणारे हे पहिलेच रेस्टॉरंट असल्याचा दावा रेस्टॉरंटने केला आहे. चंद्रशेखरपूर भागात ‘रोबो शेफ’ रेस्टॉरंट असून चंपा आणि चमेली ग्राहकांना खाद्य पदार्थ टेबलवर नेऊन देतात. खाद्य पदार्थ नेऊन दिल्यावर चंपा आणि चमेली ‘अपना माने खुशी तो’ (तुम्ही आनंदी आहात) असेही म्हणाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ‘अपना माने खुशी तो’ हे वाक्य लोकप्रिय केले होते. भारतात अनेक रेस्टॉरंटमध्ये रोबोट ग्राहकांना सेवा देत असले तरी त्यांच्यासाठी खास असा मार्ग (ट्रॅक) नसलेले रोबो शेफ हे पहिलेच रेस्टॉरंट असावे. रोबोट कोणत्याही समान पृष्ठभागावर जाऊ शकतात. दोन्ही रोबो पूर्णपणे भारतात तयार करण्यात आले आहेत. जीत बासा हे रोबो शेफचे मालक आहेत. अमेरिकेत गेलो होतो तेव्हा रोबोटने केलेली कामं पाहून यासाठी प्रेरणा मिळाल्याची माहिती बासा यांनी दिली आहे. प्रत्येकी 5.5 लाख रुपये रोबोटची किंमत असून 100 टक्के चार्ज केल्यावर ते आठ तास काम करू शकतात. रोबोट 20 किलोची ताटे, वाटया उचलू शकतात. तसेच चार्ज होण्यासाठी अर्धा तास लागतो. टॅग्स :ओदिशारोबोटहॉटेलOdishaRobothotel