भूतानच्या चिमुकल्या राजकुमारासोबत रमल्या सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 23:58 IST2017-10-31T23:53:50+5:302017-10-31T23:58:20+5:30

भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत.

या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक व राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुकही उपस्थित आहेत.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक उपस्थित सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

सुषमा स्वराजही या चिमुकल्या राजकुमारासोबत विमानतळावरून बाहेर येताना काहीशा रमल्या.

नवी दिल्लीतल्या विमानतळावर हा राज परिवार उतरल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय.