प्यार तूने क्या किया! 12 लाख खर्च करून सोनमसाठी सना बनली 'सोहेल'; तिसऱ्य़ाची एन्ट्री झाली अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:58 PM 2023-01-22T13:58:36+5:30 2023-01-22T14:04:14+5:30
दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या. त्यापैकी एकीने पुरुष बनण्यासाठी तिचे लिंग बदलले पण नंतर दुसऱ्या मुलीने तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्याचे भन्नाट किस्से हे सतत समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना आता घडली आहे. झाशीमध्ये दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या. त्यापैकी एकीने पुरुष बनण्यासाठी तिचे लिंग बदलले पण नंतर दुसऱ्या मुलीने तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे धक्कादायक प्रकरण आता न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने एनबीडब्ल्यू जारी केल्यानंतर बबिना पोलिसांनी मुलीला 2 दिवसांपूर्वी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला. मिळालेल्या माहितीनुसार, बबिना येथील खैलार येथे राहणारी सना खान प्राथमिक आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून काम करत होती.
2016 मध्ये त्याच घरात राहणाऱ्या सोनल श्रीवास्तवसोबत तिची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघींनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. 10 ऑगस्ट 2017 रोजी सनाने घर सोडले. घर सोडल्यानंतर सोनलही घर सोडून सनाकडे गेली आणि दोघी एकत्र राहू लागल्या.
सनाच्या म्हणण्यानुसार, दोघी एकत्र राहत असल्याने सोनलच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनी 18 सप्टेंबर 2017 रोजी पोलिस ठाण्यात करारनामा केला. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यानंतर सनाने तिचे लिंग बदलण्याचा मोठा निर्णय घेतला.
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये समुपदेशन झाले. शेवटी, जून 2020 मध्ये सना मुलीतून मुलामध्ये बदलली. तब्बल 12 लाख खर्च करून सुमारे 10 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सना सोहेल खान बनली. सना उर्फ सोहेलने ऑपरेशननंतर शरीर सावरायला एक वर्ष लागल्याचं म्हटलं आहे.
एप्रिल 2022 पासून सोनलने हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे काम करणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली. यानंतर तिचा स्वभाव बदलला. सोहेलने तिला नोकरी सोडण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यानंतर दोघांमधील वाद वाढला.
सोनमने काही दिवसांनी सोहेलला सोडले. यानंतर त्याने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली. हजर न झाल्यामुळे न्यायालयाने एन.बी.डब्ल्यू जारी केला. 18 जानेवारी रोजी बाबिना पोलिसांना एनबीडब्ल्यूची सेवा देण्यासाठी बोलावण्यात आले.
बबिना पोलिसांनी सोनलला अटक करून न्यायालयात हजर केले. येथून तिला जामीन मिळाला आहे. बबिनाचे निरीक्षक अशोक कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमला एनबीडब्ल्यू वॉरंटच्या आधारे अटक करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.