जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरुवात; भाविकाने साकारलं उत्तम वाळूशिल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:26 PM2019-07-04T14:26:47+5:302019-07-04T14:31:19+5:30

ओडिशामधील जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत सहभाग घेण्यासाठी अनेक भाविक पुरीत दाखल झालेत. रथ यात्रेसाठी तीन विशाल रथ तयार केले आहेत.

भगवान जगन्नाथाला वंदन म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकाराने ओडिशातील पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे शिल्प साकारले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन सपत्नीक दर्शन घेऊन आरती केली. पुरीतील रथयात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक दाखल झालेले आहेत.

पहिल्या दिवशी जगन्नाथाची रथयात्रा निघेल आणि ती जगन्नाथाची मावशी असलेल्या गुंडिचा देवी मंदिरासाठी रवाना होईल. प्रत्येकवर्षी जगन्नाथ एक आठवड्यासाठी गुंडिचा देवी मंदिरात वास्तव्य करण्यासाठी जातात.

लक्ष्मी ही भगवान जगन्नाथाची पत्नी आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ आपल्या निवासस्थानी येत नाही म्हणून लक्ष्मी देवी नाराज असते आणि त्या गुंडिचा देवी भगवान जगन्नाथ यांच्या मुलाखत करते. 8 जुलै रोजी लक्ष्मी गुंडिचा देवी मंदिरासाठी रवाना होईल अशी पौराणिक कथा आहे.

12 जुलै रोजी भगवान जगन्नाथ पुन्हा गुंडिचा देवी मंदिरातून आपल्या निवासस्थानी पुन्हा परततील. शुक्ल पक्षाच्या 11 दिवशी भगवान जगन्नाथ आपल्या घरी परतेपर्यंत भाविक मनोभावे जगन्नाथाची सेवा करत असतात.

गेल्या अनेक महिन्यांपासून या रथयात्रेची तयारी सुरू असून यासाठी विशेष रथही तयार करण्यात आले आहेत. वसंत पंचमीपासूनच विशेष रथ तयार करण्याचे काम सुरू करण्यात येते. लिंबाच्या झाडाच्या लाकडापासून हे रथ तयार करण्यात येतात.