Sardar made Masks from his own turban were felt by the needy
सरदार तुस्सी ग्रेट हो... स्वतःच्या पगडीपासून बनवले मास्क अन् गरजूंना वाटले By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:24 PM2020-06-08T12:24:52+5:302020-06-08T13:30:02+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले होते. अनेक लोकांनी वैयक्तिक पातळीवर मदतकार्य केले. उदाहरणार्थ, काहींनी स्थलांतरित मजुरांना जेवण दिले, धान्य वाटप केले. तर काही जणांनी आपल्या आसपासच्या लोकांना मदत केली. याच दरम्यान एका सरदारनेही चांगले काम केले आहे. आपल्या ११ नवीन पगड्यांचे त्यांनी मास्क तयार करून, ते गरिबांना वाटले आहे. इंडिया टाईम्सच्या म्हणण्यानुसार, हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील सुंदरनगरमधील कनैड गाव आहे. येथील रहिवासी सरदार अमरजितसिंग यांनी गरजूंच्या मदतीसाठी आपल्या नवीन पगड्यांचे मास्क तयार केले. कोरोना संकटकाळात या भागात सॅनिटायझर्स आणि मास्कची कमतरता होती. लॉकडाऊनमुळे परिसरातील सर्व दुकाने बंद होती. कापड उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत अमरजीतसिंग यांनी त्यांच्या 11 नवीन पगड्या कापल्या आणि त्याचे मास्क तयार केले. त्यानंतर हे मास्क या भागातील गरिबांना आणि गरजूंना वाटले. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अमरजीत सिंग यांनी त्यांच्या पगड्यांपासून एक हजार मास्क तयार केले. हे मास्क विशेषत: गरीब, अपंग आणि स्थलांतरित मजुरांमध्ये वाटले, असे अमरजीत सिंग यांनी सांगितले. याचबरोबर, अमरजीत सिंग हे अजूनही नवीन कपडे विकत घेऊन लोकांना मास्क वितरीत करीत आहेत. ते जिल्ह्यातील रेडक्रॉस सोसायटीचे स्वयंसेवकही आहेत. लोकांच्या मदतीसाठी ते पुढे येत राहतात. दुसरीकडे, पंजाब मध्यम उद्योग विकास मंडळाचे (पीएमआयडीबी) अध्यक्ष अमरजीतसिंग टिक्का यांनीही लुधियाना पोलिसांना सरकारने मंजूर केलेले ३५० पीपीई किट्स दिले आहे. याशिवाय, रुग्णसेवा हेच आपले पहिले कर्तव्य हे दाखवून दिले आहे, कॅनडातील शीख डॉक्टरांनी. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 2 शीख डॉक्टरांनी दाढी करण्याचा निर्णय घेतला होता. माँट्रियलमध्ये राहणारे फिजिशिअन संजीत सिंह सलूजा आणि त्यांचे न्यूरोसर्जन भाऊ रंजीत सिंह यांनी धार्मिक सल्लागार, कुटुंब आणि मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर दाढी कापण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघंही मॅक्गिल युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याहिमाचल प्रदेशपंजाबcorona virusHimachal PradeshPunjab