दर दिवशी फक्त 7 रुपये वाचवा; 5000 रुपयांची पेन्शन मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 08:57 AM2020-03-15T08:57:55+5:302020-03-15T09:08:57+5:30

असंघटीत क्षेत्रामध्ये काम करताना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करताना सरकारकडून आणण्यात आलेली अटल पेन्शन योजना (APY) एक चांगला पर्याय होऊ शकते.

प्रत्येकाला वाटते की, निवृत्त झाल्यानंतर आर्थिक मदत मिळण्यासाठी दर महिन्याला निश्चत रक्कम पेन्शनच्या रुपात मिळावी. मात्र, असंघटीत क्षेत्रामध्ये काम करताना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करताना सरकारकडून आणण्यात आलेली अटल पेन्शन योजना (APY) एक चांगला पर्याय होऊ शकते.

Atal Pension Yojana राबविण्याचे काम पेन्शन अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) द्वारा केले जाते. ही योजना 18 वर्षे ते 40 वर्षांच्या वर्गातील कोणीही घेऊ शकतो. या योजनेद्वारे तुम्हाला 1000 रुपये ते 5000 रुपयांची पेन्शन मिळू शकते.

या योजनेंतर्गत प्रिमियम तुमच्यावर ठरणार आहे. तुम्हाला निवृत्तीवेळी किती रुपयांची पेन्शन हवी आहे यावर हा हप्ता ठरणार आहे.

यासाठी योजनेमध्ये जोडले जाताना तुमचे वयही विचारात घेतले जाणार आहे. ही योजना मासिक, तिमाही किंवा सहा महिन्यांनी हप्ता भरण्याची सोय आहे.

आधी केवळ मासिक हप्ता भरण्याचा पर्याय उपलब्ध होता.

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना घेत असाल तर 60 वर्षांच्या वयामध्ये तुम्हाला 1000 रुपये वार्षिक पेन्शनसाठी महिन्याला केवळ 42 रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे.

तर 5000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी महिना 1454 रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे.

महत्वाचे म्हणजे पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्य़ाच्या वारसदाराला 8.5 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे

तुम्हाला 3000 रुपयांच्या हमखास परताव्यासाठी प्रिमिअम 126 ते 792 रुपये एवढा असणार आहे. यामध्ये पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला 5.1 लाख रुपये एकाचवेळी मिळणार आहेत.

4000 रुपयांच्या पेन्शनसाठी 18 ते 39 वर्षांच्या व्यक्तीला 168 ते 1054 रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 6.8 लाख रुपये मिळणार आहेत.