एसबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 07:16 PM 2020-09-07T19:16:25+5:30 2020-09-07T19:23:04+5:30
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं.
स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करणार आहे. एकाच झटक्यात ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी एसबीआयनं सुरू केली आहे.
एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर (व्हीआरएस) सध्या जोरात काम सुरू आहे. ही योजना लागू होताच ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
एसबीआयनं प्रस्तावित व्हीआरएस योजनेला सेकंड इनिंग टॅप व्हीआरएस २०२० असं नाव दिलं आहे. जवळपास ३० हजार जणांना या योजनेच्या माध्यमातून नारळ दिला जाईल.
३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.
एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी २.४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख इतका होता.
खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.
जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना तयार केली जात आहे. यातील किमान ३० टक्के कर्मचाऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिल्यास जुलै २०२० च्या त्यांच्या वेतनाच्या आधारे बँकेचे १ हजार ६६२ कोटी रुपये वाचतील.