This School In Assam Accepts Plastic As School Fee
प्लास्टिक द्या, शिक्षण घ्या; गरिबांना मोफत शिक्षण देणारी अनोखी शाळा By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:04 PM2019-07-23T23:04:16+5:302019-07-23T23:08:05+5:30Join usJoin usNext आसामच्या गुवाहाटीत मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा चालवत असलेली अक्षर शाळा अनेक अर्थांनी अनोखी आहे. प्लास्टिक द्या आणि शिक्षण घ्या या तत्त्वावर ही शाळा चालते. प्लास्टिकच्या कोणत्याही २५ वस्तू घेऊन आल्यास शाळेची संपूर्ण फी माफी केली जाते. गरिब मुलांना शिक्षण मिळावं, त्यांचं भविष्य घडावं यासाठी मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा यांची धडपड सुरू आहे. मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे मझीन आणि पर्मिता गोळा झालेल्या प्लास्टिकपासून विटा तयार करतात. याच विटांपासून नव्या शाळेची इमारती बांधली जात आहे. शाळेच्या परिसरात राहणारे लोक आधी प्लास्टिक जाळायचे. याचे तोटे मझीन मुख्तार आणि पर्मिता सर्मा यांनी लोकांना समजावून सांगितले. त्यामुळे प्लास्टिकचा प्रश्न मिटला. मुझीन आणि पर्मिता यांनी लोकांना प्लास्टिक जमा करण्याचं आवाहन केलं. त्या बदल्यात मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आणि एक अभिनव मोहीम सुरू झाली.टॅग्स :शिक्षणशाळाप्लॅस्टिक बंदीEducationSchoolPlastic ban