INS 'कलवरी' नौदलात दाखल, चीनची दादागिरी काढणार मोडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:40 IST2017-12-14T19:37:26+5:302017-12-14T19:40:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी आयएनएस कलवरी या स्कॉर्पियन पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले.
आयएनएस कलवरीच्या नौदलातील समावेशाने आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असून दहशतवादाविरोधात कलावरी महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले.
आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. मोदींनी या पाणबुडीला सागर हे विशेष नाव दिले.
सागर नाव देण्यामागे . 'security and growth for all in the region' सुरक्षा आणि सर्व प्रदेशाचा विकास असा अर्थ असल्याचे मोदींनी सांगितले.
स्कॉर्पियन प्रकारच्या सहा पाणबुडयांमधील आयएनएस कलवरी पहिली पाणबुडी आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान हे कलावरीचे वैशिष्टय आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाने युक्त असलेली कलावरी शत्रूवर अचूक वार करु शकते.