Sea-plane service from Statue of Unity to Sabarmati; Narendra Modi will inaugurate
स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमतीपर्यंत सी-प्लेन सेवा; नरेंद्र मोदी करणार उद्घाटन By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 04:33 PM2020-10-26T16:33:05+5:302020-10-26T16:52:00+5:30Join usJoin usNext गुजरातला ३१ ऑक्टोबरला नवीन भेट मिळणार आहे. अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे. या सी-प्लेन सेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे सी-प्लेनमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती रिव्हरफ्रंटपर्यंत प्रवास करतील. ३० ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी जंगल सफारी पार्क, क्रूझ बोट, भारत भवन, एकता नर्सरी, चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन करतील. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य वनचे उद्धाटन करतील आणि नवीन आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. यानंतर सी प्लेन येथून अहमदाबादला रवाना होतील. ३१ ऑक्टोबरपासून १९ सीटर सी-प्लेन दररोज ४ उड्डाण करणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती ४८०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. सी-प्लेन सरदार सरोवर धरणाच्या तलावा क्रमांक-३ मध्ये उतरेल. सी-प्लेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमधील असल्याचे म्हटले जाते. सी-प्लेनची सुरुवात पंतप्रधानांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, मात्र आता याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे. दरम्यान, हे सी-प्लेन गेल्या काही दिवसांपूर्वी मालदीवहून कोचीला पोहोचले होते. आता ते गुजरातमध्ये आले आहे. या सी-प्लेनची सुरुवातीला सेवा केवडिया ते अहमदाबाद दरम्यान राहील. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबाद आणि केवडिया येथे सी-प्लेनसाठी जेट्टी बांधण्याचे काम चालू होते आणि इतर सर्व कामांचीही तयारी सुरू होती.टॅग्स :स्टॅच्यू ऑफ युनिटीनरेंद्र मोदीगुजरातStatue Of UnityNarendra ModiGujarat