Seeing the mysterious cave in India
भारतातल्या 'या' रहस्यमयी गुहा पाहिल्यास उडेल थरकाप By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 04:14 PM2019-06-11T16:14:29+5:302019-06-11T16:19:28+5:30Join usJoin usNext भीमबेटका गुहा- मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रतापानी वाइल्ड लाइफ सेंक्च्युअरीच्या आत भीमबेटका ही गुहा आहे. ही गुहा पाषाण काळापासून अस्तित्वात आहे. बोरा गुहा- जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या विलियम किंग जॉर्ज यांनी ही गुहा 1807मध्ये आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील अराकू व्हॅलीजवळच्या अनंतगिरी पर्वतांमधून शोधून काढली होती. याची गुहेची खोली 80 मीटर आहे. अमरनाथ गुहा- अमरनाथ गुन्हा ही भारतातल्या अनेकांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे. इथे बर्फातून भगवान शंकराची पिंडी प्रकट होते. हजारोंच्या संख्येनं भक्त इथे येतात. अंडावल्ली गुहा - ही गुहा प्राचीन काळातल्या कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. वैष्णोदेवी- जम्मू-काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिर हे भारतातल्या सर्वात प्राचीन गुहेपैकी एक आहे. हे हिंदूंचं श्रद्धास्थान असून, शक्तीच्या 52 पीठांपैकी एक आहे. उदयगिरी आणि खांडगिरी गुहा- ओडिशामध्ये उदयगिरी आणि खांडगिरी गुहा प्रकृती आणि मानवनिर्मित कल्पकतेचा मिलाप आहे. हिला आर्कियोलॉजिकल आणि हिस्टॉरिकलरीत्या धार्मिक महत्त्व आहे. एलिफंटा गुहा- महाराष्ट्रातल्या एलिफंटा ही गुहा मानवनिर्मित आहे. याला सिटी ऑफ केव्ह्स म्हटलं जातं.