seemanchal express accident delhi bound train derailed bihar tragic
Seemanchal Express Accident : दुर्घटनेची भीषणता दाखवणारी दृश्यं, 7 जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 11:29 AM2019-02-03T11:29:38+5:302019-02-03T11:46:46+5:30Join usJoin usNext बिहारहून नवी दिल्लीकडे येणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील सहदेई बुजुर्ग या ठिकाणाजवळ ही रेल्वे दुर्घटना घडली. हे ठिकाण पाटणापासून जवळपास 46 किमी अंतरावर आहे. घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित बी3, एस8, एस9, एस10 या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. आसपासच्या जिल्ह्यातील डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी; सोनपूर 06158221645, हाजीपूर 06224272230 आणि बरौनी 06279232222. रेल्वेकडून भीषण दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना आर्थिक मदत जाहीर टॅग्स :अपघातबिहारपीयुष गोयलनितीश कुमारAccidentBiharpiyush goyalNitish Kumar