Shankaracharya Jayendra Saraswati passed away of Kanchi Kamkoti Peetha
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:00 PM2018-02-28T22:00:34+5:302018-02-28T22:00:34+5:30Join usJoin usNext चेन्नई : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. कामकोटी पीठाचे ते 69 वे शंकराचार्य होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता जयेंद्र सरस्वती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. तिरुवरुर जिल्ह्यातील इरुलनीकी गावात 1935 साली त्यांचा जन्म झाला. मठाचे 68 वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी 22 मार्च 1954 साली सुब्रमण्यन यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले. दरम्यान, शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. टॅग्स :चेन्नईChennai