शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:57 PM2020-03-12T16:57:14+5:302020-03-12T17:03:54+5:30

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना, आपल्या संपत्तीचं विवरणपत्रही त्यांनी जोडलंय.

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे.

शरद पवार यांची संपत्ती गेल्या 6 वर्षात 60 लाख रुपयांनी वाढली आहे. त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची संपत्ती 32.73 कोटी रुपये एवढी आहे

सन 2014 च्या राज्यसभा निवडणुकांवेळी शरद पवार यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी एवढी होती. त्यामध्ये जंगम मालमत्ता 20 कोटी 47 लाख 99 हजार 970.41 रुपये एवढी होती

. तर, स्थावर मालमत्ता 11 कोटी 65 लाख 16 हजार 290 रुपये एवढी होती.

आता, बुधवारी त्यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शपथपत्रातील संपत्ती विवरणानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती 72.73 कोटी एवढी आहे.

त्यामध्ये, जंगम संपत्ती 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये एवढी आहे.

. शरद पवार यांनी 1 कोटी रुपयांचे कर्जही आहे. तर, पत्नी प्रतिभा पवार यांना अॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून 50 लाख रुपये मिळाल्याचेही या शपथपत्रात सांगण्यात आले आहे.

यावरुन, गेल्या 6 वर्षांमध्ये शरद पवार यांच्या संपत्तीत जवळपास 60 लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. 6 वर्षात 60 लाख रुपये म्हणजे आश्चर्य वाटेल का नाही.