shocking...car swing on a pipe over drain for 35 minutes but driver saved
थरार...बुडत्याला केबलचा आधार; नाल्यावर तब्बल 35 मिनिटे लटकून राहिली कार By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 05:23 PM2019-11-12T17:23:59+5:302019-11-12T17:26:13+5:30Join usJoin usNext नोएडामध्ये बिसरख परिसरात रविवारी एका कारला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उघड्या नाल्यामध्ये पडता पडता थांबली. केबलच्या पाईपवर जवळपास कार 35 मिनिटे लटकून राहिली. यानंतरचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. ही कार होंडाची अमेझ होती. पाईपावर लटकल्याने यातील चालक वाचला खरा पण त्याला बाहेर काढण्यासाठीही लोकांना खूप प्रयत्न करावे लागले. नाहीतर जराजरी तोल ढळला असता तर कारसह चालक वाहत्या नाल्यामध्ये पडला असता. नाल्यामध्ये लटकलेली कार पाहून लोकांनी गर्दी केली. जवळपास 35 मिनिटांच्या प्रयत्नानंतर लोकांनी कारला बाहेर काढले. मात्र, त्याआधी त्यात अडकलेल्या चालकालाही बाहेर काढले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सोमवारपासून व्हायरल होत आहे. याबबात बिसरख पोलिसांनी अपघाताची कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे सांगितले. माहिती काढल्यावर समजले की चालक कार मागे घेत असताना हा अपघात झाला होता. टॅग्स :अपघातहोंडा अमेझAccidentHonda Amaze