Sikkim Airport Highlights PM Inaugurates Airport In Pakyong
निसर्गाच्या कुशीत वसलेलं सिक्कीम एअरपोर्ट; मन होईल प्रसन्न By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:52 PM2018-09-24T17:52:47+5:302018-09-24T18:26:02+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं आहे. सिक्किमवासीयांचं विमानतळाचं स्वप्न आज साकार झालं आहे. 2009 मध्ये या विमानतळाचं काम सुरू झालं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. टॅग्स :सिक्किमविमानतळनरेंद्र मोदीsikkimAirportNarendra Modi