काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 23:15 IST2019-11-06T23:12:18+5:302019-11-06T23:15:17+5:30

जम्मू-काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवनच. गेल्या अनेक वर्षांपासून दिवसांपासून या नंदनवनावर दहशतवाद्यांची छाया आहे. पण कलम 370 हटवल्यानंतर हा भागात काहीशी शांतता नांदू लागली आहे.

आज काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली असून, या नंदनवनात पुन्हा चैतन्य संचारलं.

या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हिमवृष्टीमुळे पांढरे शुभ्र दिसणारे डेरेदार वृक्ष सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झाले आहे.

जम्मूच्या लेहमध्ये उणे 17, गुलमर्गमध्ये उणे 12, पहलगाममध्ये उणे 14 तर कटरामध्ये 4.2 आणि श्रीनगरमध्ये उणे 5.2 अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला आहे.