Snowfall in Jammu and Kashmir and Himachal Pradesh
जम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:20 PM2018-11-03T15:20:23+5:302018-11-03T15:24:09+5:30Join usJoin usNext जम्मू-काश्मीर अन् हिमाचल प्रदेशच्या उंच भागात बर्फाची चादर पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे ही मोसमातील पहिली बर्फवृष्टी आहे. दोन्ही राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे हालत खराब आहे. काश्मीरच्या जोजिला पास, द्रास, कारगिल, सोनमर्ग, पहलगाम आणि गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली. जवळपास 12 तास होणा-या बर्फवृष्टीमुळे महामार्ग ठप्प झाले आहेत. पर्यटकही स्वतःच्या शिबिरामध्ये अडकले आहेत. हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्येही बर्फवृष्टी झाली आहे. मनालीतलं तापमान झपाट्यानं खाली आलं आहे. बर्फवृष्टी होत असली तरी दोन्ही राज्यांमध्ये उद्या परिस्थिती सामान्य होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. टॅग्स :जम्मू-काश्मीरहिमाचल प्रदेशJammu KashmirHimachal Pradesh