काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी, आजसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:00 IST2020-02-12T15:56:37+5:302020-02-12T16:00:06+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी झाली आहे. काश्मीरच्या पर्वतराजीत बर्फवृष्टी आणि मैदानी भागात हलक्या सरीचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

जम्मूच्या संभागही ढग दाटून आले असून, वातावरणातही कमालीचा बदल झाला आहे. 12 ते 13 फेब्रुवारीला काश्मीरच्या अनेक भागांत पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे.

जम्मूच्या संभागमध्येही पाऊस पडू शकतो. श्रीनगर-लेह राष्ट्रीय राजमार्गही बंद करण्यात आला आहे.

राजोरी आणि पुंछपासून शोपियाला जोडणाऱ्या मुगल रोडवरही बर्फवृष्टीमुळे झाकला गेला आहे. काश्मीरच्या पर्वतीय भागात हलक्या सरीचा पाऊसही झाला आहे.

श्रीनगरचं दिवसाचं तापमान 2.0 डिग्रीवरून खाली येऊन 7.5 डिग्रीवर पोहोचलं आहे. काश्मीरच्या सर्वत भागात रात्रीचं तापमान कमालीच्या नीचांकी स्तरावर येत आहे.

जम्मूमध्ये पुन्हा एकदा गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या 48 तासांत जम्मू-काश्मीरच्या आणखी काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.