शिमल्यात बर्फवृष्टी, रस्त्यांवर पसरली बर्फाची सफेद चादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 15:16 IST2018-01-24T15:03:09+5:302018-01-24T15:16:31+5:30

हिमाचलमध्ये दीड महिन्यानंतर मंगळवारी पाऊस पडला आणि शिमला व सिरमौरमध्ये सीजनमधील पहिली बर्फवृष्टी झाली.

उत्तराखंडच्या देहरादूनमधील गढवाल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली.

या सीजनमध्ये 40 दिवसांनंतर शिमल्यात बर्फवृष्टी झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेली बर्फवृष्टी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बर्फवृष्टीमुळे शिमल्यातील 143 मार्ग बंद करण्यात आले असून ते सुरू व्हायला तीन-चार दिवस लागू शकतात.