Some 'touching' cartoons of Hindu Rashtra Balasaheb Thackeray
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 05:30 PM2018-01-22T17:30:55+5:302018-01-22T17:59:18+5:30Join usJoin usNext २३ जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९१वी जयंती. कणखर आवाज आणि त्याच आवाजातील भाषणं आणि ज्वलंत पण मार्मिक व्यंगचित्रे ही त्यांची ओळख. याच व्यंगचित्रांच्या आवडीखातर त्यांनी द फ्री प्रेस जर्नलमधून काम केलं मात्र नंतर स्वत:चं ‘मार्मिक’ हे प्रकाशन सुरु केलं. या दिवसानिमित्ताने पाहुयात त्यांची काही व्यंगचित्रं. १) १९५६ - स्वतंत्र हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचं हे सत्यचित्र. मोठे उद्योगपती, त्यांचे उद्योगसमूह, बडे भांडवलदार त्यांची ‘शेठगिरी’ गरगरा फुगत असताना सार्वजनिक उपक्रमांचे मात्र कुपोषण सुरु होते. केंद्रीय मंत्री व योजना आयोगाचे उपाध्यक्ष असलेल्या गुलझारीबद्दल नंदा सार्वजनिक उपक्रमांच्या वाढीसाठी बड्या उद्योगपतींकडे आशेने पाहत होते. २) १९६० - काश्मिर प्रशानावर फक्त चर्चा आणि बैठका. भारत-पाक पंतप्रधानांचे हे नेहमीचेच मॅच फिक्सींग. नेहरु-अयुब खानांपासून आजपर्यंत. ३) १९६० - देशाची जनता, गरिबी, दारिद्र्याच्या वणव्यात होरपळत असताना पं. नेहरु व त्यांचे मंत्रिमंडळ ‘महागाई’ कमी होईल, या आशेने चंद्रकोरीकडे पाहत बसले. ४) १९६२ - अरुणाचल प्रदेशात चिन्यांनी हिंदुस्थानच्या हद्दीत प्रवेश केला तरी पं. नेहरु आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन पडखाऊ धोरण सोडत नव्हते. ५) १९६७ - इंदिराजींनी काँग्रेस व सत्तेची सूत्रे हाती घेताच झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगाल, तमिळनाडुसह नऊ राज्यांत काँग्रेसविरोधी कौल मिळाला आणि इंदिरा विरोधकांच्या हाती कोलीत मिळाला. ६) १९७१ - इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा राजकीय नारा दिला, पण गरीब झोपडीत व राज्यकर्ते अंबारीत बसून फिरु लागले. गरिबी हटाव हे शेवटी ढोंगच राहीले. ७) १९८१ - बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या भूमिपुत्रांस असे चिरडले. देशाचा नकाशा विद्रुप केला. ८) मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाची आणि अस्मितेची जाणीव करुन देण्यासाठी. ९)१९८४ - शब्दाची गरज नाही. देश अंधारला. इंदिराजी गेल्या.टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईव्यंगचित्रकारBalasaheb ThackerayShiv SenaMumbaiCartoonist