राजधानी दिल्लीत शिल्पकारांनी साकारले रावणारे पुतळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 15:36 IST2017-09-28T15:33:51+5:302017-09-28T15:36:37+5:30

देशभरात नवरात्रौत्सवाची धूम पाहायाला मिळते आहे. दसरा अवघ्या दोन दिवसांवर आला असताना दसऱ्यासाठी सगळीकडे विशेष तयारी सुरू आहे.

दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची पद्धत आहे. त्यासाठी बाजारात मोठमोठे रावणाचे पुतळे बनविले जात आहेत.

दिल्लीमध्ये शिल्पकारांनी विविध रंगाचे रावणाचे भलेमोठे पुतळे तयार केले आहेत.

दिल्लीतील तितारपूर भागात रावणाचे हे भलेमोठे पुतळे पाहायला मिळत आहेत. या पुतळ्यांसमोर सेल्फी काढण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत.