एका 'बुलेट राणी'ची संघर्षमयी कथा; अडचणींवर मात करत लिहिली यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 05:21 PM2020-02-05T17:21:28+5:302020-02-05T17:37:02+5:30

कोणतेही काम लहान अथवा मोठं नाही. जर काम करण्यास समर्पित भावना आणि कौशल्य असेल तर प्रत्येक काम तुम्हाला नवीन ओळख प्राप्त करुन देईल. आपल्या मेहनतीच्या बळावर रांचीची मुलगी बेबीने अशीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजधानी रांचीमधील पिस्का भागात बुलेट सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करणारी 21 वर्षीय मुलीला बुलेट राणी या नावाने लोकं ओळखतात.

आर्थिक अडचणीमुळे बारावीच्या पलीकडे शिक्षण घेण्यास असमर्थ ठरलेली ही मुलगी बुलेट मेकॅनिक म्हणून काम करते. तिचं कार्य इतकं प्रसिद्ध झालं आहे की, दूरवरुन लोक बुलेट दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिसिंग सेंटरवर पोहोचतात.

बेबीने मारवाडी कॉलेजमधून इंटर पर्यंत शिक्षण घेतले आहे. दोन वर्षे पदवीधर घेत असतानाच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. काम करत करत तिने गेली सात वर्षांपासून बुलेट बनवण्याचे आणि ऑपरेट करण्याचे काम शिकून घेतलं.

स्वत:च्या हिंमतीवर तिने केलेल्या संघर्षाची कहाणी इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या सर्व्हिस सेंटरचे मालक फुरकान म्हणतात की बेबीचे काम ग्राहकांना आवडतं. म्हणून तिच्याकडून बुलेटचं काम करुन घेण्यासाठी लांबून लोक येत असतात.