Student aggression at JNU in delhi, not for selling education
'शिक्षण विकण्यासाठी नसतंय वो', JNU चे विद्यार्थी आक्रमक By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:28 AM2019-11-20T10:28:53+5:302019-11-20T10:36:04+5:30Join usJoin usNext वसतिगृहांमधील फीमध्ये केलेली वाढ रद्द करावी या मागणीसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर लाठीमार करून पोलिसांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत केला. तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे टी.एन. प्रथपन, बसपचे दानिश अली यांनी हा विषय लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. केंद्र सरकार उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची धुळधाण उडवत आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी या खासदारांनी केली असून विरोधकांनीही सरकारला लक्ष्य केलंय जेएनयू विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशन गड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १८६ आणि ३५३ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा विद्यापीठाजवळ रोखून ठेवण्यात आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांनी रस्त्यावर उभारलेले बॅरीकेट्स तोडून पुढे येण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांना आंदोलनकर्त्या विद्यर्थ्यांवर केलेल्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यानंतर, विद्यार्थी आक्रमक झाले असून देशभरात पडसाद उमटत आहेत जेएनयुतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत असून पुणे विद्यापीठातूनही या आंदोलनास पाठिंबा देण्यात आलाटॅग्स :दिल्लीविद्यार्थीलोकसभाआंदोलनdelhiStudentlok sabhaagitation