पती बँकर, पत्नी CA... चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली शेती; आता वर्षाला 1 कोटीचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:23 PM2022-09-19T14:23:26+5:302022-09-19T14:29:25+5:30

Success Story : जोधपूरमधील एका जोडप्याने नोकरी सोडून शेती सुरू केली असून आज त्यांचा वार्षिक नफा जवळपास 1 कोटी रुपये आहे.

शिक्षण घेतल्यानंतर लोक नोकरी शोधायला सुरुवात करतात आणि काही लोकांना फार कमी वेळात यश मिळते. चांगली नोकरी सोडून सेंद्रिय शेती केल्याचं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. जोधपूरमधील एका जोडप्याने हे केलं आहे. त्यांनी नोकरी सोडून शेती सुरू केली असून आज त्यांचा वार्षिक नफा जवळपास 1 कोटी रुपये आहे.

जोधपूरचा रहिवासी असलेल्या ललितने एमबीए केल्यानंतर बँकेत काम करायला सुरुवात केली, तर त्याची पत्नी खुशबू चार्टर्ड अकाउंटंट होती. यानंतर त्यांनी नोकरी सोडून सेंद्रिय शेती सुरू केली आणि तो एक फायदेशीर व्यवसाय ठरला. ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे त्यांच्यासाठी ललित आणि खुशबू हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

नोकरी करत असताना ललितला सेंद्रिय शेतीबद्दल फारशी माहिती नव्हती आणि त्याबद्दल फक्त ऐकले होते. मात्र, ते सुरू करण्यापूर्वी सेंद्रिय शेतीवर पूर्ण संशोधन करून जोधपूरला येऊन उद्यान विभागाकडून प्रशिक्षण घेतले. पॉलीहाऊस आणि ग्रीन हाऊसबद्दल त्यांना समजले. जयपूर येथील कृषी संशोधन केंद्रातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारकावे जाणून घेतले.

ललितने जेव्हा सेंद्रिय शेती सुरू केली तेव्हा लोकांनी त्याला घाबरवलं त्यात यश आले नाही, असं सांगिचलं. पण त्याने त्याची चिंता न करता या क्षेत्रात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला. ललित सांगतो की, जेव्हा त्याने त्याच्या वडिलांकडे वडिलोपार्जित जमीन मागितली तेव्हा सुरुवातीला ते मान्य झाले नाहीत, पण नंतर हळूहळू तयार झाले.

प्रशिक्षणानंतर ललितने शेतावर शेडनेट हाऊस लावून भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली आणि नंतर हळूहळू पॉलीहाऊसही उभारले. फलोत्पादन विभागाकडून अनुदान घेऊन त्यांनी काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी तुर्की येथून बियाणे आणले. 2015-16 मध्ये एकूण 28 टन काकडीचे उत्पादन घेऊन 4 लाख रुपये खर्चून 12 ते 13 लाख रुपये निव्वळ नफा झाला.

ललित यांनी त्यानंतर रोपवाटिका सुरू केली आणि त्यावेळी त्यांची उलाढाल 23 ते 30 लाख रुपये होती. यानंतर हळूहळू तो 60 ते 80 लाख रुपयांवर पोहोचला. आज त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे.

ललितची पत्नी खुशबू सीए असून सुरुवातीला तिला सेंद्रिय शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती. जरी तिने तिच्या पतीला पूर्ण पाठिंबा दिला आणि आता ती संपूर्ण व्यवसाय हाताळत आहे. खुशबू सांगतात की आज त्या लोकांनी 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना शेतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - झी न्यूज)