IPS Jyoti Yadav : जबरदस्त! आधी डॉक्टरची डिग्री, नंतर UPSC पास अन् झाली IPS; आता थेट शिक्षणमंत्र्यांशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:08 PM2023-03-14T12:08:56+5:302023-03-14T12:30:11+5:30

IPS Jyoti Yadav : पंजाबमधील एक आयपीएस अधिकारी खूप चर्चेत आहे.

पंजाबमधील एक आयपीएस अधिकारी खूप चर्चेत आहे. डॉ. ज्योती यादव (Dr. Jyoti Yadav IPS) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस (Harjot Singh Bains Education Minister) यांच्याशी साखरपुडा झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोघे लग्न करणार आहेत. लोकप्रिय IPS ज्योती यादव यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया... ज्योती यादव यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1987 रोजी हरियाणातील गुडगाव येथे झाला.

सध्या त्या 35 वर्षांच्या आहे. त्याचं कुटुंब गुरुग्रामच्या सुशांत लोक येथे राहतं. IPS ज्योती यादव यांचे वडील राजेंद्र सिंह हे ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात आणि आई सुशीला देवी गृहिणी आहेत.

ज्योती यादव यांची गणना देशातील यशस्वी, तडफदार महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. ज्योती यादव यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण गुरुग्राममधील शेरवुड पब्लिक स्कूलमधून केले.

बारावीनंतर बीडीएसचे शिक्षण घेऊन त्य़ा डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्या यूपीएससी परीक्षेची (Doctor to IPS Officer) तयारी करू लागला. ज्योती यादव यांनी 2019 च्या नागरी सेवा परीक्षेत 437 वा क्रमांक मिळवला आहे.

IPS ज्योती यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. Instagram वर 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की त्यांना देश-विदेशात फिरण्याचीही खूप आवड आहे.

ज्योती यादव पंजाब केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या मानसा येथे एसपी म्हणून कार्यरत आहेत. याआधी लुधियानाच्या ADCP होत्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.