'सुपरस्टार रजनीकात देशातील एकाच नेत्याला ट्विटरवर करतात फॉलो' By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:39 PM 2021-10-28T16:39:01+5:30 2021-10-28T16:51:24+5:30
बॉलिवूडमधील केवळ अमिताभ बच्चन यांनाच ते ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर एकूण 24 जणांना रजनीकांत फॉलो करतात, त्यामध्ये बॉलीवूडचा बादशहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.
‘मनिकर्णिका’ व ‘पंगा’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावत यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला.
राजधानी दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे, रजनीकांत यांनी दोन दिवसांनी दोन्ही प्रमुखांची भेट घेतली.
रजनीकांतने ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभेच्छा मिळाल्याने आनंद झाल्याचे म्हटले.
रजनीकांत यांच्यासोबत या भेटीत त्यांच्या पत्नी लता रजनीकांत ह्याही उपस्थित होत्या. दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार आपले गुरू दिवंगत चित्रपट निर्माते बालाचंदर यांच्यासह अनेकांना समर्पित केला आहे.
रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आपण राजकारणात येणार नसल्याचं रजनीकांतने सांगितले. मात्र, रनजीकांत यांच्या ट्विटरचा अभ्यास केल्यास.
ट्विटरवर देशातील केवळ एकाच राजकीय नेत्याला ते फॉलो करत असल्याचं दिसून येतं. त्यामध्ये, पीएमओच्या अधिकृत हँडलला आणि राजकीय नेता म्हणून नरेंद्र मोदींना ते फॉलो करतात.
बॉलिवूडमधील केवळ अमिताभ बच्चन यांनाच ते ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर एकूण 24 जणांना रजनीकांत फॉलो करतात, त्यामध्ये बॉलीवूडचा बादशहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.