Surely visit this luxurious hotel in India once!
भारतातल्या या आलिशान हॉटेलला आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट द्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 10:56 PM2017-11-05T22:56:05+5:302017-11-05T23:11:08+5:30Join usJoin usNext भारतात एकाहून एक सरस हॉटेल आहेत. परंतु त्यात काही अशीसुद्धा हॉटेल्स आहेत की त्यांचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. हैदराबादेतील फलकनुमा पॅलेस हे देशातील आलिशान हॉटेलांपैकी एक आहे. फलकनुमा पॅलेसमध्ये सर्वात स्वस्त रूमसाठी तुम्हाला एका दिवसाला 33 हजार रुपये मोजावे लागतात. तर रॉयल सूटचं भाडं 1 लाख 95 हजारांच्या घरात आहे. उदयपूरचं ताज लेकसुद्धा पर्यटकांमध्ये फारचं लोकप्रिय आहे. या हॉटेलचं सौंदर्य पाहून तुम्हाला एकदा तरी त्याला भेट द्यावी अशी इच्छा नक्कीच होईल. जयपूरमध्ये ओबेराय ग्रुपच्या मालकीचं असलेला द ओबेराय ताजविलास हे हॉटेलसुद्धा फार सुंदर आहे. यातील सर्वात महागड्या रूमचं भाडं 2,30000 इतकं आहे. आग्र्यातील हॉटेल ओबेरॉय अमरविलास भारतातील महागड्या हॉटेलांपैकी एक आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र लक्झरी रूममध्ये राहण्यासाठी दीड लाख भाडं मोजावं लागतं. टॅग्स :हॉटेलhotel